breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोना: साता-यात ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

मुंबई : कोरोनाची लागण आता महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातही पोहोचल्याची दिसत आहे. साताऱ्यात ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. कॅलिफोर्नियातून प्रवास करून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संदर्भातील चाचण्या केल्यावर त्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. आता या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. आता साताऱ्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ही दोनवर पोहोचली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाची लागण ही दुबईतून प्रवास करून आलेल्या दाम्पत्याकडून आली. आता पुण्यातील हे दाम्पत्य कोरोना फ्री झाले आहेत. आज या दोघांना घरी पाठवण्यात येणार आहे. दुबईतून प्रवास करून आलेल्या ४० जणांच्या ग्रुपमध्ये या दोघांचा समावेश होता. यानंतर कोरोना महाराष्ट्रात घुसला. आतापर्यंत देशात ४७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर देशात हा आकडा ९७ वर पोहोचला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button