breaking-newsमनोरंजन

प्रियांकाचा ‘पाणी’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ‘पर्पल पेबल पिक्चर्स’चा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पाणी’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून आदिनाथचा हा पहिलाच चित्रपट असल्यानं अनेकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

अमिर खानसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी पुढाकार घेऊन दुष्काळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हातभार लावायला सुरूवात केली आहे. पाण्याच्या भीषण समस्येवर प्रकाश टाकणारा ‘पाणी’ हा चित्रपट मराठवाड्यातील सत्य घटनेवर आधारित असणार आहे. नगरवाडीमधल्या एका व्यक्तीच्या जिद्दीची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यानं एकही मुलगी या गावात लग्न करायला तयार होत नाही. त्यामुळे नायकाचं लग्न जुळण्यासही अडचणी येत असतात अशा वेळी गावातील प्राण्याचा प्रश्न तो कसा सोडवतो हे चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. प्रियांकानं ट्विट करत या चित्रपटाची घोषणा केली आहे.

PRIYANKA

@priyankachopra

This is what I had envisioned when starting @PurplePebblePic…A platform for good stories & new talent. is special because it’s based on a true story & deals with a very topical issue.Welcome aboard @adinathkothare & team…let’s create something special together! https://twitter.com/PurplePebblePic/status/996239430930153472 

Purple Pebble Pictures@PurplePebblePic

We’re happy to share that our 4th Marathi project, ‘Paani’, will begin shooting soon! It’s an inspirational tale based on a true story, directed by @adinathkothare. Stay tuned…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button