प्रसिद्ध गायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. कोरोनाने सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनाही घेरले आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि दोन मुली सना व एना अमेरिकेच्या लॉस अँजल्स शहरात राहतात. कुमार सानू जवळपास प्रत्येक महिन्याला त्यांना भेटायला जात होते. मात्र जानेवारीनंतर कोरोनाचा धोका वाढल्याने त्यांना अमेरिकेत जाता आले नाही. त्यानंतर ते काल गुरुवारी सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने अमेरिकेतील लॉस अँजल्स शहरात जाणार होते. परंतु विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे अमेरिकेत जाणे रद्द झाले. तसेच बीएमसीने त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. सध्या ते गोरेगाव येथील आपल्या घरी क्वारंटाईन असल्याचे समजते आहे.