ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरवमधून पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत

नगरसेवक शशिकांत कदम यांच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांसह मित्रपरिवाराचा मोठा प्रतिसाद

पिंपरी : प्रतिनिधी

राज्यावर कायम असलेले कोरोनाचे संकट आणि कांही दिवसांपूर्वी कोकण व अन्य ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे झालेले नुकसान यामुळे पिंपरी चिंचवड मनपाचे नगरसेवक शशिकांतआप्पा कदम यांनी यंदाचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. कोकण,कोल्हापूर, सातारा येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. नगरसेवक शशिकांतआप्पा कदम यांनी ‘मदत न्हवे कर्तव्य’ या भावनेतून आपला मित्र परिवार, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव येथील सातारा मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, आदींसह नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदत द्यावी असे आवाहन केले होते .

Food and other necessities for flood victims from Pimple Gurav

Food and other necessities for flood victims from Pimple Guravया आवाहनाला परिसरातील नागरिक तसेच नगरसेवक कदम यांच्या हितचिंतक व मित्रपरिवाराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शशिकांत आप्पा यांच्या मदतीच्या आवाहनामुळे या ठिकाणी कांही दिवसातच सुमारे २० टन धान्य जमा झाले होते . २० किलोचे एक किट या प्रमाणे अकराशे कुटुंबांना पुरेल इतपत अन्नधान्य तसेच ब्लॅंकेट, चादर व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात ही मदत जमा झाली होती.


नगरसेवक शशिकांत कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तुची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पूजन करून ही मदत नुकतीच रवाना करण्यात आली. यावेळी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक व उद्योजक शंकरशेठ जगताप, नगरसेवक सागर आंघोळकर, नगरसेवक संतोष कांबळे,हर्षल ढोरे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, नगरसेविका उषा मुंढे,माधवी राजापूरे,सीमा चौगुले,शारदा सोनवणे, सातारा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव माने,उपाध्यक्ष संजय चव्हाण, ,डॉ. प्रदीप ननवरे,प्रा.प्रल्हाद झरांडे,खान्देश मित्र मंडळ अध्यक्ष प्रा.उमेश बोरसे,नामदेव तळपे,शिवाजी कदम ,कैलास बनसोडे आदी मान्यवर व कदम परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
चिपळूण, लोटेगाव, पाटण तालुक्यातील कोयना परिसरातील मिरगाव, गोकुळनाला, बाजे, ऐणाचीवाडी येथील पूरग्रस्तांना त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन ही मदत देण्यात आली. दरम्यान मागील वर्षी देखील सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी साडेसात लाख रूपयांचा धनादेश निधी स्वरूपात नगरसेवक शशिकांतआप्पा कदम व मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आला होता. नगरसेवक कदम यांच्या पुढाकाराने झालेल्या या मदतीमुळे पूरग्रस्त नागरिकांनी आभार व्यक्त केले. तसेच पिंपळे परिसरातील नागरिकांनीही शशिकांतआप्पांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले. नगरसेवक कदम यांनीही मदतीच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानत सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button