breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

प्रवासी मजुरांना २ महिने मोफत धान्य, ‘वन नेशन वन रेशनकार्ड’

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या प्रवासी मजूर आणि शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. प्रवासी मजुरांना पुढचे २ महिने मोफत धान्य दिलं जाणार आहे. रेशन कार्ड नसणाऱ्यांसाठी प्रत्येक व्यक्तीला ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणाडाळ देण्यात येईल. याचा ८ कोटी मजूरांना फायदा होईल, तसंच यासाठी ३,५०० कोटी रुपये देत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं.

वन नेशन वन रेशनकार्ड ही सुविधा ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू करणार. याचा ६७ कोटी लाभधारकांना याचा फायदा होईल. वन नेशन वन रेशनकार्डच्या माध्यमातून नागरिकांना देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या रेशन दुकानात धान्य मिळेल. याशिवाय केंद्र सरकारने रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसाठी ५ हजार कोटी रुपयांच्या पत सुविधेचीही घोषणा केली आहे. प्रवासी मजूर आणि शहरातल्या गरिबांसाठी घरभाडं कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button