TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

डॉ. विष्णू माने महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

पिंपरी : महासेवा आणि रेड ॲंट संस्थेच्या वतीने गर्भसंस्कार चॅलेंज कोर्स चे संचालक डॉ.विष्णू माने यांना मुंबई येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री इशा कोपीकर,आदिती गोवित्रिकर,माजी मंत्री कृपाशंकर सिंग,शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर या मान्यवर शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर आय इ एम एस या अमेरिकन इंस्टिट्यूट चा ऑनररी डॉक्टरेट इन सायकॉलॉजी देखील हि पदवी बहाल करण्यात अली.

डॉ माने यांचा गर्भसंस्कार हा ऑनलाइन पद्धतीचा कोर्स जगभरातील 15 देशांमधून एक लाख पन्नास हजार महीला यशस्वीरीत्या करत आहेत तसेच ते गर्भस्थित अवस्थेमध्ये असता स्त्रियांनी शारीरिक आरोग्यबरोबर मानसिक दृष्टया व भावनीकरित्या देखील सदृढ़ बनवण्यासाठी कार्यरत असतात आणि म्हणूनच यांना त्यांच्या गर्भसंस्कार या क्षेत्रामधल्या भरीव कामगिरिनिमित्त महासेवा आणि रेड ॲंट संस्थेच्या वतीने महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ विष्णू माने म्हणाले कि, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान मला मिळतोय यापुढे अजुन काम करण्याची प्रेरणा मिळाली तसेच आजपर्यंत त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत ज्यांचे ज्यांचे योगदान आहे आशा सर्वांचे देखील आभार यावेळी त्यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button