breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यंदा प्रदुषणमुक्त उत्सवाकडे गणेश भक्तांची वाटचाल

पिंपरी – गणेश मंडळांसह घरगुती गणपतीच्या मुर्तींसाठी हिंदु धर्माच्या विधीनुसार लागणा-या वस्तू, फुलांची सजावट हे साहित्य वापरण्यात आले. परंतु, काहींना गणरायांच्या मुर्तीबरोबर फुलांचे निर्माल्य देखील पाण्यात टाकण्याची परंपरा प्रीय वाटते. त्यामुळे नदी प्रदुषण होणार नाही, याची खबरदारी गणेश भक्तांनी घेतली आहे.

पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पिंपळे सौदागर, सांगवी भागातील घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी आलेल्या भक्तांनी दहा दिवस जमा केलेले निर्माल्य पाण्यात न टाकला ते कुंडीत टाकल्याचे दिसून आले. त्यासाठी विविध कंपन्या, सामाजिक संस्थाचे स्वयंसेवक घाटावर काम करत होते. विसर्जनासाठी गणरायाचे घाटावर आगमण होताच स्वयंसेवक शिताफीने पुढे जाऊन निर्माल्य एकभ गोळा करत होते. हिंजवडीतील एमक्युअर कंपनीचे जवळपास 30 कर्मचारी हे काम करत होते.

त्याचबरोबर घाटांवर संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गणेश मुर्ती दाण म्हणून स्वीकारत होते. दिवसभरात जवळपास दहा हजाहून अधिक गणेश मुर्ती प्रतिष्ठानने संकलीत केल्या आहेत. त्याला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर पालिकेच्या वतीने नदी पात्रात गणेश मुर्ती विसर्जित करण्याऐवजी घाटावरील हौदात विसर्जित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी घरगुती गणपतीच्या मुर्ती हौदातच विसर्जीत केल्या. त्यासोबत आलेले निर्माल्य नदीपात्रात जाणार नाही, याची खबरदारी स्वयंसेवकांनी कसोशिने घेतली. त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button