breaking-newsमनोरंजन

प्रदर्शनापूर्वीच ‘ 2.0’ वादात, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनचा चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप

रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ 2.0’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. कारण टेलिकॉम कंपन्यांची संघटना असलेल्या सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं ‘ 2.0’ मधील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. या संघटनेनं सूचना व प्रसारण मंत्रालयाला एक पत्र लिहिलं आहे. चित्रपटात मोबाईलचा वापर आणि मोबाईल टॉवर याविषयी जास्तीत जास्त नकारात्मक बाबी दाखवल्या गेल्या आहेत असं या तक्रार पत्रात म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘ 2.0’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये खलनायकाची भूमिका साकारलेला अक्षय कुमार मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणाऱ्या परिणाविषयी बोलत आहे. या दृश्यावर सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं आक्षेप घेतला आहे. मोबईल आणि मोबाईल टॉवरमुळे होणारे दृष्परिणाम अधिक वाढवून सांगितले आहे, जे साफ चुकीचं आहे.

जोपर्यंत चित्रपट निर्माते या दृश्याविषयी समाधानकारक उत्तर देत नाहीत तोपर्यंत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं केली आहे. यासाठी सेन्सॉर बोर्डाकडेही तक्रार करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील सात दृश्यांवर आक्षेप घेत त्या दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले होते. जगभरातील १० हजार स्क्रीनवर तेलगू, तामिळ, हिंदी भाषेत ‘ 2.0’ प्रदर्शित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button