breaking-newsमनोरंजन

जान्हवीची मदत न केल्याने बहीण अंशुलाला धमक्या; ट्रोलर्सना अर्जुनचं सडेतोड उत्तर

रिअॅलिटी शोमध्ये जान्हवी कपूरची मदत न केल्याने बहीण अंशुलाला धमक्या देणाऱ्यांना, ट्रोल करणाऱ्यांना अभिनेता अर्जुन कपूरने खडेबोल सुनावले आहेत. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अर्जुन आणि जान्हवीने नुकतीच हजेरी लावली होती. या शोमधील एका टास्कदरम्यान अंशुलाने जान्हवीची मदत केल्याने तिच्यावर जोरदार टीकाटिप्पणी होऊ लागली. इतकंच नव्हे तर तिला बलात्काराच्या, जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या. या सर्व प्रकारानंतर भाऊ अर्जुनने सोशल मीडियावर टिकाकारांना सुनावले आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीला एक टास्क दिला जातो. ज्यामध्ये त्या सेलिब्रिटींनी दुसऱ्या सेलिब्रिटींना फोन करून ‘हाय करण इट्स मी,’ असं बोलण्यास सांगावं लागलं. जो सर्वांत आधी फोन उचलून करणला ‘हाय’ बोलतो, तो या टास्कमध्ये जिंकतो. जान्हवीने या टास्कदरम्यान सावत्र बहीण अंशुलाला फोन लावला होता. अंशुलाने तिचा फोन उचलला खरा पण गोंधळामुळे तिला काय बोलावं हेच समजलं नाही. त्यामुळे जान्हवी या टास्कमध्ये हरली. पण यावरून सोशल मीडियावर अंशुलावर जोरदार टीका होऊ लागली. जान्हवीची मदत न केल्याने तिला धमक्याही येऊ लागल्या.

आपल्या बहिणींच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहणाऱ्या अर्जुनने मात्र या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. ‘कॉफी विथ करणमध्ये जे घडलं त्याला इतकं महत्त्व देण्याची गरज नाही असं मला वाटलं होतं. पण आता मी माझ्या भाषेवर आणखी संयम ठेवू शकत नाही. आमच्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ती तुमच्या आई किंवा बहिणींवर कधीच ओढवू नये अशी मी आशा करतो,’ असं ट्विट त्याने केलं. अर्जुनसोबतच जान्हवीनेही अंशुलाची पाठराखण केली. ‘फोनवर तिला माझा आवाज नीट ऐकू येत नव्हता. शो संपल्यानंतर तिने मला फोन करण्यामागचं कारण विचारलं,’ असं स्पष्टीकरण जान्हवीने दिलं.

Arjun Kapoor

@arjunk26

Something I assumed was an absolute non issue on Koffee with Karan has escalated into @anshulakapoor being abused & I can’t be bothered by protocol anymore. F**k all those trolls who wish harm to my sister. I hope ur mom or sister never have to go thru what u have put us thru…

९१० लोक याविषयी बोलत आहेत

 

अर्जुन कपूर आणि अंशुला हे बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची मुलं आहेत. बोनी कपूर यांची दुसरी पत्नी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन संपूर्ण कपूर कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. जान्हवी आणि खुशीला ट्रोल करणाऱ्यांनाही याआधी अर्जुनने खडेबोल सुनावले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button