breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील शूटिंग केलेला कोणताही भाग वगळणार नाही- डाॅ.अमोल कोल्हे

पुणे |महाईन्यूज|

शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी दिली.

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. तसंच आपली मागणी मान्य केल्याचा दावाही खोतकर यांनी केला. त्यावर कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेली अडीच वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे, परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे, कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल,” असं खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

https://www.instagram.com/tv/B83L8cMJCtV/?utm_source=ig_web_copy_link
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button