Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

५० वर्षांचा ‘सुवर्ण’ प्रवास! राजधानीतून प्रवास करणाऱ्या ९० वर्षीय आजोबांचा पश्चिम रेल्वेकडून सत्कार

९० वर्षीय प्रवाशाचा पश्चिम रेल्वेकडून सत्कार

मुंबईः  मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने सुवर्ण महोत्सवात पदार्पण केल्यानिमित्त पश्चिम रेल्वेने राजधानीचा जंगी वाढदिवस मंगळवारी साजरा केला. या दिनाचे औचित्य साधून गेली ५० वर्षे राजधानीतून प्रवास करणाऱ्या कमरुजमान सारंग यांचाही विशेष प्रवासी प्रतिनिधी म्हणून रेल्वे प्रशासनाने सत्कार केला. प्रतीक्षायादीतील प्रथम श्रेणी तिकिटाचे आरक्षण अंतिमक्षणी पक्के झाल्याने आजोबांचा राजधानी प्रवासाचा नेम चुकला नाही.

उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सर्व रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. त्याला राजधानीही अपवाद नाही. मशीद बंदर येथे राहणाऱ्या कमरुझजमान सारंग यांनी ८ मे ला राजधानीचे तिकीट आरक्षित केले. त्यावेळी प्रतीक्षायादीत ते ११व्या स्थानी होते. प्रवासाची तारीख उजाडली तरी तिकीट प्रतीक्षायादीतच असल्याने सारंग यांनी थेट पश्चिम रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापकांचे कार्यालय गाठले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी द्वितीय वातानुकूलित आसन देण्याची तयारी दर्शवली. मात्र, ‘मी गेल्या ५० वर्षांपासून राजधानीच्या प्रथम श्रेणीतून प्रवास करत आहे. माझे वय पाहता वरिष्ठ नागरिकांच्या राखीव आसनामध्ये व्यवस्था करावी’, असे आजोबांनी सांगताच रेल्वे अधिकाऱ्यांनी थेट वाढदिवसाचे निमंत्रण देत आवर्जून उपस्थित राहण्यास सांगितले. त्यामुळे पहिल्या राजधानीतून प्रवास करणारा प्रवासी ५०व्या वर्षीही पुन्हा राजधानीला लाभला.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. व्ही. एल. सत्यकुमार यांच्या उपस्थितीत मुंबई सेंट्रल येथे रंगलेल्या वाढदिवसानिमित्त राजधानीत प्रवासी सेवेचे कर्तव्य बजावलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते. याप्रसंगी माजी रेल्वे अधिकाऱ्यांनी राजधानीतील गोड आठवणींना उजळा दिला. चेन्नई, पुणे येथून रेल्वप्रेमी सुवर्ण महोत्सवी राजधानीतून प्रवास करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. पश्चिम रेल्वेने प्रवाशांना पहिल्या राजधानीचा फोटो असलेले किचेन, विशेष तिकीट प्रवाशांना भेट म्हणून दिले. विशेष पोस्टल कव्हरचेही अनावरण करण्यात आले.

मुंबईत रेल्वे सर्वोत्तमच

‘१९३२मध्ये मुंबईत जन्म झाला. बालपण, शिक्षण मुंबईत झाले. मुंबईत लोकल असो वा राजधानी, प्रवासासाठी रेल्वेच सर्वोत्तम आहे. वेळेवर खाणे, झोप घेणे हे आपल्या सुदृढ आरोग्याचे रहस्य असल्याने रेल्वे स्थानकातील पादचारी पूल बिनदिक्कत चढता-उतरता येतो’, असे म्हणत राजधानीतील आदरातिथ्यासाठी सारंग यांनी रेल्वे प्रशासनाला धन्यवाद दिले. उपनगरात प्रवास करताना ते खासगी गाडीपेक्षा लोकलला प्राधान्य देत असल्याने आम्हालाही त्यांच्याबरोबर लोकलमधून प्रवास करावा लागतो, असे सारंग यांचे चिरंजीव साजिद कमरुजमान यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button