breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही होळी खेळणार नाही…

दिल्ली | महाईन्यूज |

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या पाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाचे सर्व आमदार यावर्षी होळी खेळणार नाहीयेत….कोरोना व्हायरसचा असलेला धोका आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला…मात्र अरविंद केजरीवाल यांचं होळी न खेळण्यामागचं कारण वेगऴ आहे…हे कारण त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर-पूर्व दिल्लीत झालेला हिंसाचाराच्या कारणामुळे केजरीवाल आणि त्यांचे आमदार यावर्षी होळी खेळणार नाहीत. नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधातील आंदोलनाच्या काळात दिल्लीत धार्मिक हिंसा उसळली होती. या हिंसेत 40 हून अधिक लोक मरण पावले. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसेनंतर दिल्ली सरकारने पीडितांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर कोरोना व्हायरसचा असलेला धोका आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर होळी मिलन कार्यक्रमात सहभाग घेणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, जगभरातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेऊ नये. त्यामुळे आपण यावेळी होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button