breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रजासत्‍ताक दिनी छत्रपती ताराराणींच्या पुतळ्याकडे मनपाचे दुर्लक्ष

कोल्हापूर |महाईन्यूज|

प्रजासत्‍ताक दिना निमित्‍त कोल्‍हापूर शहरात महानगरपालिकेकडून स्‍वच्छता करण्यात आली. मात्र कोल्‍हापूर शहराचा मानबिंदू असलेली छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्‍याचे दिसून आले.

कोल्‍हापूर शहराच्या ताराराणी चौकामध्ये करवीर संस्‍थापिका छत्रपती ताराराणी यांचा आश्वारूढ पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. या पुतळ्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलझाडे ही लावण्यात आली आहेत. यामुळे शहरात येताना हा भव्य पुतळा आपले लक्ष वेधून घेतल्‍याशिवाय रहात नाही. मात्र आज २६ जानेवारी प्रजासत्‍ताक दिनी या पुतळ्याकडे मनपा प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष झाल्‍याचे दिसून आले. या पुतळ्यावर धुळ साचल्‍याने हा पुतळा किमान आज प्रजासत्‍ताक दिनी तरी धुवून स्‍वच्छ करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. यामुळे सर्वसामान्य कोल्‍हापूरकरांकडून या विषयी नाराजी व्यक्‍त करण्यात येत होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button