breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

विदर्भात भाजपला धक्का, मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरावती – निवडणुकींच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरू असते. मात्र, आता भाजपलाच मोठा धक्का बसणार आहे. कारण अमरावतीमधील माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार डॉ.सुनील देशमुख भाजपला रामराम ठोकणार असून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 19 जून रोजी मुंबई येथील टिळक भवनात प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती स्वतः सुनील देशमुख यांनी दिली आहे.

कोणत्याही अटी शिवाय प्रवेश करत असल्याची कबुली स्वतः डॉ. सुनील देशमुख यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच अमरावतीमध्ये येऊन गेले होते. याच दरम्यान नाना पटोले व सुनील देशमुख यांची चर्चा झाली व या चर्चेतच सुनील देशमुख यांची घरवापसी निश्चित झाली. त्यामुळे आता येणाऱ्या काळात काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू होणार असल्याचे दिसत आहे.

सुनील देशमुख हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले होते. 1999 ते 2004 या काळात काँग्रेस आमदार होते. तसंच 2004 ते 2009 दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अर्थराज्यमंत्रिपद भुषवले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची साथ सोडून देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.

काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरूच

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी अकोल्याचे शेतकरी मुरलीधर राऊत  यांचं मन की बात कार्यक्रमातून  तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यांनी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. बाळापूर तालुक्यातील पारस फाट्यावर हॉटेल मराठा नावाने त्यांचं हॉटेल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 नोव्हेंबर 2016 मध्ये मन की बात या कार्यक्रमात राऊत यांचं कौतुक केलं होतं. नोटबंदीच्या काळात राऊत यांनी पैसे नसणाऱ्या अनेक लोकांना मदत केली होती. महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या हॉटेलमधून मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या या कार्याची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button