breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020: हैदराबादची मुंबई इंडियन्सवर 10 विकेट्सने मात, हैदराबादची प्ले ऑफमध्ये धडक

शारजाह – आयपीएलमध्ये काल झालेल्या चुरशीच्या सामन्यात एकही विकेट न गमावता मुंबईवर दणदणीत विजय मिळवून डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे विजयी आव्हान एकही विकेट न गमावता 17.1 षटकांतच पूर्ण केले. हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा या सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद 151 धावांची भागीदारी केली. या विजयासह हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला. तर कोलकाताचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आता प्ले-ऑफमध्ये हैदराबादचा सामना आरसीबीच्या संघाबरोबर होणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीला हैदराबादने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी भाग पाडले. त्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक धावा केल्या. पोलार्डने 25 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. मुंबईकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने 25 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 36 धावांची खेळी केली. तर इशान किशन 33 धावांवर बाद झाला. हिटमॅन रोहित शर्माने 4 सामन्यानंतर पुनरागमन केले. मात्र त्याला विशेष काही करता आले नाही. रोहित 4 धावांवर माघारी परतला. कृणाल पांड्याला भोपळाही फोडता आला नाही. तर सौरभ तिवारी एका धावेवर बाद झाला. हैदराबादकडून संदीप शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डर-शहबाज नदीमने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रशिद खानने 1 विकेट घेतली.

तसेच विजयी आव्हानाचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने 58 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 85 धावा केल्या. तर ऋद्धीमान साहाने 45 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली. मात्र मुंबईच्या एकाही गोलंदाजाला एकही विकेट घेता आली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button