breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रजासत्ताकदिनी पुण्यात ५५० फुटी इमारतीवर फडकणार तिरंगा

पुणे |महाईन्यूज|

अमनोरा टाऊनशिपमधील गेटवे टॉवरच्या इमारतीच्या शिखरावर सर्वात उंच अशा भारताच्या तिरंगा ध्वजाचे अनावरण उद्या (दि.२६ जानेवारी) सकाळी करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील हडपसर उपनगरात अमनोरा टाऊनशीप मधील ४५ मजली गेटवे टॉवरच्या शिखरावरील छतावर फडकवण्यात येणारा हा सर्वात उंच तिरंगा आहे. ४५ व्या मजल्यावर ३० फूट उंचीच्या पोलवर ३० फूट बाय २० फूट असा तिरंगा ध्वज फडकावण्यात येणार आहे. जमिनीपासून ५५० फूट उंच असणाऱ्या गेटवे टॉवरवर हा झेंडा फडकवण्यात येणार आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना सिटी कार्पोरेशनचे उपाध्यक्ष सुनील तरटे यांनी, ” सिटी ग्रुपचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांची ही मूळ कल्पना आहे. गेटवे टॉवरच्या ४५ व्या मजल्यावर ३० फूट उंचीचा लोखंडी खांब लावण्यात आला आहे. त्यावर हा तिरंगा फडकणार आहे. २६ जानेवारीला सकाळी त्याचे ध्वजारोहण करून तो दोन दिवस ठेवण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button