breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

‘आज परत सांगतो.. पार्थ… लंबी रेस का घोडा है’, भाजप आमदाराकडून कौतुक

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे सध्या बरेच चर्चेत आहेत. आज (बुधवार) शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना नातू पार्थ पवार हे अपरिपक्व असून त्यांच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नसल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अगदी विरुद्ध भूमिका घेतल्याचं मागील काही दिवसांमध्ये दिसून आलं आहे.

त्यामुळेच आता थेट शरद पवार यांनी अशा प्रकारची टिप्पणी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे शरद पवार यांनीच पार्थ पवारांचे कान टोचले असले तरीही दुसरीकडे भाजपच्या एका आमदाराने पार्थ पवार यांचे प्रचंड कौतुक केले आहे. ‘पार्थ.. लंबी रेस का घोडा है’ असं या आमदाराने म्हटलं आहे.

शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबतचं मत व्यक्त करुन काही वेळ उलटत नाही तोच नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र पार्थ पवार यांचं कौतुक केलं आहे. ‘आज परत सांगतो.. पार्थ… लंबी रेस का घोडा है! थांबू नकोस मित्रा!’ असं थेट ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कारण काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनी ‘जय श्री राम’ म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र देखील लिहिलं होतं. या सगळ्या घडामोडींमुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी पक्ष आणि पार्थ पवार यांच्याविषयी चर्चा सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button