breaking-newsक्रिडा

चेन्नईचा पंजाबवर 5 गडी राखून विजय

पुणे – दीपक चहार, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाच गडी राखून पराभव करत पंजाबचे आयपीलच्या बाद फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग केले आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकांत सर्वबाद 153 धावा करत चेन्नई समोर 154 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना चेन्नईने 19.1 षटकात 5 गडी गमावत 159 धावा करत पंजाबवर विजय मिळवला.

चेन्नईची सुरुवात खराब झाली त्यांचे तीन गडी 40 धावातच परतले होते. मात्र सुरेश रैना एका बाजुने फलंदाजी करत असताना धोनीने आज हरभजन सिंग आणि दिपक चहारला बढती देत आधी फलंदाजीला पाठवले होते हरभजनला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही मात्र चहारने फटकेबाजी करताना केवळ 20 चेंडूत 39 धावा केल्या. चहार बाद झाल्या नंतर धोनी आणि रैनाने चेन्नईच्या विजयावर शिक्का मोर्तब केला.

तत्पूर्वी, मनोज तीवारी आणि डेव्हिड मिलरयांच्या सावध फलंदाजीनंतर मयंक अगरवालने अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने 19.4 षटकांत सर्वबाद 153 धावा करत चेन्नई सुपर किंग्ज समोर विजयासाठी 154 धावांचे आव्हान ठेवले आहे.

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत पंजाबला एकापाठोपाठ एक धक्के दिले. ज्याच्याकडून स्फोटक फलंदाजीची अपेक्षा केली जात होती. ख्रिस गेल शून्यावर बाद झाला. तर ऍरोन फिंचही चार धावांवर बाद झाला. फॉर्मात असलेला के एल राहूलही 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि मनोज तीवारी यांनी 60 धावांची भागीदारी केली. तीवारी बाद झाल्यानंतर मिलरही बाद झाला.

त्यानंतर करुण नायरची आक्रमक फटकेबाजी वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने चेन्नईविरुद्धच्या लढतीत मोठी धावसंख्या उभारण्यात किंग्स इलेव्हन पंजाबला अपयश आले. करुण नायरने केलेल्या 26 चेंडूत 54 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबला सर्वबाद 153 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी 154 धावांचे आव्हान ठेवले. चेन्नईकडून लुंगी निगिडीने भेदक मारा करत पंजाबच्या 4 फलंदाजांना परतीची वाट दाखवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button