breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोलच्या दरात आजही वाढ

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात सुस्ती आली असली तरी भारतात मात्र पेट्रोलच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यात आज दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ११ पैशांनी तर मुंबईत १० पैशांनी महागले आहे. १३ दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे त्याच्या दरात आतापर्यंत १.५१ रुपये एवढी वाढ झाली आहे. मात्र गेल्या २७ दिवसांपासून डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ११ पैशांनी वाढ झाल्यामुळे पेट्रोलचा दर ८१ रुपये ९४ पैसे झाला आहे. तर डिझेल ७३ रुपये ५६ पैसे लिटर आहे. तसेच मुंबईत पेट्रोलचा दर १० पैशांनी वाढल्यामुळे ते ८८ रुपये ५८ पैसे लिटर झाले आहे. तर डिझेलचा दर ८० रुपये ११ पैसे लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलच्या दरात १० पैशांची वाढ झाल्यामुळे ते ८३ रुपये ४३ पैसे आणि चेन्नईत ९ पैसे लिटर पेट्रोल महागल्यामुळे तेथे ८४ रुपये ९१ पैसे आणि बेंगळुरूत ११ लिटर एवढी दरवाढ झाल्याने तेथे पेट्रोलचा दर ८४ रुपये ६० पैसे लिटर झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button