breaking-newsराष्ट्रिय

पुल कोसळल्या प्रकरणी सात जणांवर कारवाईचा आदेश

लखनौ – वाराणसीतील पूल दुर्घटनेच्या संबंधात युपी ब्रिज कार्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक रंजन मित्तल यांच्या सह अन्य सहा जणांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या या दुर्घटननेत 15 जणांचा बळी गेला आहे. प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक एच. सी तिवारी, व्यवस्थापक के. आर. सदन, असिस्टंट इंजिनियर राजेश सिंग, इंजिनियर लालचंद, माजी प्रकल्प व्यवस्थापक गेंडा लाल आणि सहायक व्यवस्थापक राजेश पाल अशी कारवाई करण्याचा आदेश देण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

कालच राज्य सरकारने मित्तल यांची युपी ब्रिज कार्पोरेशनच्या व्यवस्थापकिय संचालक पदावरून हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची बांधकामे सुरू आहेत त्या सर्व ठिकाणी योग्य ती दखल घेण्याची सूचना राज्यभरातील अधिकाऱ्यांना दिली आहे. अशा ठिकाणी कोणती काळजी घ्यायची याची यादीच त्यांनी आदेश म्हणून जाहीर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button