breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

धक्कादायक! भावाच्या लग्न समारंभात नाचताना १५ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Viral Video | हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. याच दरम्यान उत्तर प्रदेशातून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. भावाच्या लग्न समारंभात नाचताना १५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील एटा येथे लग्नात नाचताना एका १५ वर्षाच्या मुलाचा कोसळून मृत्यू झाला. भावाच्या लग्न समारंभात नाचत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. हे सगळं अचानक घडल्यानं आनंदी लग्नाच्या उत्सवाला गंभीर वळण मिळाले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात लग्नसमारंभ असला की नाच, गाणे आलंच. याचप्रकारे याठिकाणीही लोक डीजेवर नाचत होते. यामध्ये अनेक तरुण नाचताना दिसत आहेत, यावेळी त्यातला एक १५ वर्षीय मुलगा नाचता नाचता खाली कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो. व्हिडिओमधील बाकी तरुण मृत तरुणाच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत.

हेही वाचा     –      Mahashivratri 2024 | आज महाशिवरात्रीला ५ दुर्मिळ योग; जाणून घ्या शुभ मुहूर्त 

या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून @SachinGuptaUP नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button