breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पुलवामात सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला, ‘आईडी’चा स्फोट घडवून जवानांवर अंदाधूंद गोळीबार

श्रीनगर | महाईन्यूज

देशाच्या सीमावर्ती भागात अतिरेक्यांच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मिरच्या पूलवामा येथील केंद्रीय रिजर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच सीआरपीएफच्या (CRPF) दलावर दहशतवाद्यांनी आज सकाळी हल्ला केला.

या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्तीवर IED चा हल्ला केला. आयईडीचा स्फोट झाल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करायला सुरुवात केली. मात्र, या चकमकीत एक जवान किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांनी पुलवामाच्या सर्कुलर रोडवर तैनात असलेल्या सुरक्षादलावर हल्ला केला. सुरुवातीला दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला त्यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी हा हल्ला केला.

हल्ला झाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण विभागाला घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button