Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

चिखलदरा मेळघाटात दूषित पाण्यामुळं दोघांचा मृत्यू; ग्रामसेवक पंधरा दिवसांपासून बेपत्ता, नागरिकांनी केला गंभीर आरोप

अमरावतीः चिखलदरा मेळघाटात पाणीपुरवठा विभागात होणारे निकृष्ट दर्जाचे काम व भ्रष्टाचार यामुळे मेळघाटातील जनतेला आपले प्राण सुद्धा गमवावे लागत असताना काही अधिकारी मागील अनेक वर्षापासून खुर्चीवर कायम आहेत. मेळघाटातील दोन आदिवासींची दुषित पाणी प्यायल्यामुळं जीव गेल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील पाचाडोंगरी येथे घडल्याची समोर आली आहे. दोघांचा दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले असले तरी प्रशासन मात्र अद्याप सुस्त आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.

सविस्तर वृत्त असे, चिखलदरा तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच डोंगरी गावाचा पाणीपुरवठा काही दिवसापासून बंद असल्यामुळे गावकरी गावातील रज्जी भानू अखंडे यांच्या खासगी उघड्या विहिरीतून पिण्यासाठी पाणी वापरत होते. ही विहीर पूर्णपणे उघडी असून कोणत्याही प्रकारचे शुद्धीकरण झालेलं नाही. या दूषित पाण्यामुळे गावातील गंगाराम नंदराम धिकार वय २५ व सविता सहदेव अखंडे वय ३० या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, २० ते २५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. इतर काही गावकरी उपजिल्हा रुग्णालय चुरणी येथे पोहोचू शकत नसल्याने त्यांचा उपचार पाचडोंगरी गावातच करण्यात येत असल्याची माहिती मिळालेली आहे या घटनेमुळे चिखलदरा तालुक्यात पुन्हा एकदा निकृष्ट नियोजन व प्रशासनाची पोलखोल झाल्याचे नागरिकांकडून आरोप होत आहे.

पंधरा दिवसांपासून ग्रामसेवक बेपत्ता आहे.

खडीमाल येथे कार्यरत असलेले वादग्रस्त ग्रामसेवक विनोद सोळंके यांना आता कोयलाही ग्रामपंचायत देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र विनोद सोळंके हे मागील पंधरा दिवसापासून बेपत्ता असून संबंधित ग्रामसेवकाला नागरिकांनी पाणीपुरवठा योजना बंद असल्याची माहिती वारंवार दिली होती. मात्र त्याकडे याकडे दुर्लक्ष केले गेले. तसंच, ग्रामसेवक सोळंके हे बेपत्ता असल्याचंही समोर आलं आहे.

वादग्रस्त सोळंके आजही कामावर कार्यरत

खडीमाल येथे कार्यरत असलेले विनोद सोळंके यांनी पाणीपुरवठा योजनाच्या नावावर खडीमाल येथे लाखोंचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असून स्वतः सरपंचांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. असं असतानाही सोळंके यांना निलंबित न करता कोयलारी ग्रामपंचायत दिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सोळंके यांचा वरिष्ठांपर्यंत लॉबिंग मजबूत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

मेळघाटात पाणीपुरवठा विभागामध्ये निकृष्ट काम आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे. ग्रामसेवकांसह पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर कलम ३०२ नावे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तेव्हाच मेळघाटात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची डोळे उघडतील आणि भ्रष्टाचारावर काही प्रमाणात आळा बसेल.

सौ. दुर्गाताई प्रभुदास बिसंदरे तालुकाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस धारणी, मेळघाट

रुग्णालयात दाखल रुग्णांची नावे

सहदेव रामजी अखंडे, मानकू रामजी अखंडे, भगवती रवी अखंडे, काडमी छोटेलाल धांडे, संतोष छोटेलाल धांडे, साधना संतोष धांडे, भुता सुकलाल कासदेकर, कोलाई भुता कासदेकर, गंगाराम ओमकार तोटा, जानकी पांडू अखंडे, बुधिया कालू जामुनकर, राणू लालमन जामुनकर, शांता रानु जामुनकर, सुकाराम रोंगे अखंडे, रामकली सुरेश अखंडे, शिवम बाबुराव कासदेकर, बाबू कासदेकर, नंदू बाबू कासदेकर, माला बंशी अखंडे, दया दयाराम कासदेकर, आशा नंदराम धिकार अंकिता संतोष धांडे, काली नंदराम अधिकार, रुख्मी गंगाराम अधिकार पिकला नंदराम धिकार, झापिया दयाराम कासदेकर, आयुष राजाराम अखंडे

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button