breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात PMPML बसच्या 584 फेऱ्या रद्द

पुणे |महाईन्यूज|

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ‘पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दर 10 मिनिटांऐवजी आता 20 मिनिटानी बस स्टॉपवर बस येणार आहे. गर्दीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय योजना केल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसच्या दररोज 1800 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. मात्र बस वाहतुकीच्या माध्यमातून ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी ही संख्या एक हजारच्या आत आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार आज (बुधवार 18 मार्च) बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पहिल्या 24 तासात प्रवासी संख्या 12 लाखांवरुन 9 लाखांवर आली आहे.

‘कोरोना’विषयी जनजागृती झाल्यामुळे अनेकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडणं पसंत केलं आहे. खाजगी वाहनाने प्रवास करण्यास पसंती देणारे पुणेकर घरी राहण्यात धन्यता मनात आहेत. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. PMPML ची प्रवासी संख्या रोडावली आहेच. मात्र सार्वजनिक वाहतुकीतून ही आकडेवारी वाढू नये, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.

गेल्या पाच दिवसांपासून पीएमपीएलचे रोजचे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु ‘कोरोना’सारखा जीवघेणा विषाणू फोफावण्यापेक्षा होणारे नुकसान परवडणारे आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एकाला ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button