breaking-newsपुणे
गरवारे महाविद्यालयातील सत्यनाराण पूजा स्थगित
पुणे – गरवारे महाविद्यालयात कर्मचाऱ्यांकडून आयोजित सत्यनाराण पूजाही स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यनारायण पूजेवरून संस्थेकडून सल्ला मागतिला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे.
गरवारे महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात “सत्यनारायण पूजा’ घातली जाते. त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्या पद्धतीने नियोजनही केले. पुढच्या आठवड्यात ही पूजा केली जाणार होती. मात्र काही विद्यार्थी संघटेनने याला विरोध केला आहे. त्यामुळे वाद टाळण्यासाठी महाविद्यालयाने ही पूजा स्थगित केला आहे.
यासंदर्भात, महाविद्यालयाने संस्थेला पत्र पाठवून, याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्यनारायण पूजेवरून वाद निरर्थक असल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे.