TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू!

मुंबई : गेल्या ३८ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विना, अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. १ व २ नोव्हेंबर रोजी शिक्षक समन्वय संघासोबत पार पडलेल्या बैठकीत १५ नोव्हेंबर रोजी मागण्यांच्या पूर्ततेबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घोषणा करतील, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते. परंतु ही घोषणा न झाल्यामुळे बुधवारी शिक्षकांच्या असंतोषाचा उद्रेक पाहायला मिळाला.

बॅरिकेट्स पार करून मुख्यमंत्र्यांच्या वर्षां निवासस्थानी जाऊन निषेध नोंदविण्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला होता. पोलिसांनी वेळीच अडवल्यामुळे आंदोलन चिघळले नाही. शेवटी पुन्हा शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले आणि मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या एकूण ६५०० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील एकूण ६५००० विना, अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या ३८ दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून आझाद मैदानात मांडले जात आहेत. या आंदोलनामध्ये जवळपास ७ ते ८ हजार पुरुष शिक्षक व २५० ते ३०० महिला शिक्षकांचा समावेश आहे, तर काही लहान मुलेही शिक्षकांबरोबर आली आहेत. ‘शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून यंदाची दिवाळी आम्ही काळी दिवाळी म्हणून साजरी केलीे. प्रत्येक शिक्षक कुटुंबाला सोडून ३८ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आह. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही’, असे शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button