breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे तर फक्त मुख्यमंत्रीपद जाईल; सेनेतील बंडखोरीने खरे नुकसान काँग्रेसचे

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा शेवट कसा होईल याचे उत्तर कोणाकडेच नाही. उद्धव ठाकरे सरकार सत्तेत राहणार की या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला हवे आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सत्ता संघर्षानंतर जे राजकीय चित्र समोर येणार आहे ते कसे असेल. टाइम्स ऑफ इंडियामध्ये नीरजा चौधरी यांनी लिहलेल्या लेखात सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संघटातील एक वेगळा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडले आणि शिवसेनेमध्ये फुट पडली तर यामुळे फक्त सेना कमकूवत होणार नाही अन्य एका राजकीय पक्षाला फटका बसू शकतो. त्याच बरोबर राज्यात भाजपची ताकद वाढू शकते.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा सरकार कोण स्थापन करणार. शिवसेनेत फुट पडली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप नेतृत्व या क्षणाची वाट पाहत आहे की केव्हा ते बंडखोर आमदारांसह बहुमताचा आकडा पार करतील. शिंदे यांनी पुरेशा आमदारांचा पाठिंबा मिळवला तर ते दावा करू शकता की उद्धव ठाकरे नाही तर ते स्वत: शिवसेनेचे नेते आहेत. त्यानंतर शिंदेच्या नेतृत्वाखालील गट हा अधिकृत शिवसेना होईल आणि भाजपचा सरकार स्थापनेचा दावा मोकळा होईल. त्याच्या सोबत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार देखील असतील. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत २० आमदार असे होते ज्यांनी भाजपला मतदान केले. जर शिंदे यांना पुरेशा आमदारांचा पाठिंबा मिळाला नाही तर राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. जोपर्यंत शिंदे आणि भाजप हे सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत पोहोचत नाहीत.

  • उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे जाणार?

अशी देखील एक शक्यता आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे स्वत:ची आणि पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला पाठिंबा देऊ शकतील. असे करताना ते देवेंद्र फडणवीस नव्हे तर अन्य व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची अट ठेवू शकतील. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना मुंबई येण्याचे आवाहन केले आहे. तसे झाले तर महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र बंडखोरांची असे म्हणणे आहे की शिवसेनेने भाजप सोबत सरकार स्थापन करावे.

  • सर्वात मोठे नुकसान काँग्रेसचे…

राज्यात सुरू असलेल्या या नाट्यात शिवसेनेला मोठा फटका बसत असल्याचे दिसत असले तरी आणखी एक पक्ष आहे ज्याला मोठा झटका बसू शकतो. हा पक्ष म्हणजे काँग्रेस होय. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात सध्या काँग्रेस सत्तेत आहे. जर महाविकास आघाडी सरकार पडले तर आर्थिक पॉवरहाऊस असलेल्या राज्यातील काँग्रेस सत्ता जाणार. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पक्षाचे केंद्रीय नेतृत्व कमकूवत होऊ शकते आणि पक्षाची परिस्थिती खराब होऊ शकते. इतक नाही तर पक्षाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या सर्व वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत:च्या पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेस कमकूवत झाल्यास निर्माण होणारी पोकळी राष्ट्रवादीकडून भरून काढली जाऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button