breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात मनसेचे ‘राज’ गुपित, पदाधिका-यांना मोबाईल बंदी

पुणे – लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर जोरदार शरसंधान साधले होते. आता मनसेने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे. मात्र बैठकीतील माहिती आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांना मिळता कामा नये. म्हणून बैठकीला येणार्‍या प्रत्येक पदाधिका-यांचा मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात आले आहे.

राज ठाकरे हे विधानसभेच्या निवडणूका स्वबळावर लढवणार की, काँग्रेस महाआघाडीसोबत जाणार याकडेस सर्वांचे लक्ष लागले आहे. राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सुध्दा कृष्णकुंजावर जाऊन राज यांची भेट घेतली होती. मात्र त्याचा तपशील कळू शकला नाही. आता राज कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेणार आहेत. राज यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील अशोकनगर येथे तीन दिवसीय शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला सकाळपासून सुरुवात झाली आहे.

बैठकीला येणार्‍या प्रत्येक पदाधिका-यांचे मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात आले आहे. तर, प्रसारमाध्यमांना देखील आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. मनसैनिकांना दिलेले कानमंत्र, याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना मिळता कामा नये असे आदेश राज यांच्याकडून देण्यात आले आहे. पुण्यातील बैठकीत राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहे. विधानसभेच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा करणार असून विविध जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या बैठका घेणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सर्वांचे लक्ष राज यांच्याकडे लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button