breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात बेड मिळवण्यासाठी ठिय्या आंदोलन; अखेर ‘त्या’ रुग्णांचा मृत्यू

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात सात ते आठ दवाखाने फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका रुग्णाने काल रात्री कुटुंब आणि मित्रांसह अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर या रुग्णाला विश्रांतवाडीतील एका रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं. परंतु त्या रुग्णाचा आज दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मनोज कुंभार असं या रुग्णाचं नाव आहे. त्याला निमोनियाचा त्रास होत असल्याची नातेवाईकांनी सांगितलं. तो धायरी परिसरातील रहिवासी आहे. त्रास वाढल्याने नातेवाईकांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. दुपारी एक वाजल्यापासून नातेवाईक रुग्णवाहिकेसह वेगवेगळ्या रुग्णालयात चकरा मारत होते. मात्र, अनेक ठिकाणी जाऊन आल्यावर सुद्धा त्याला बेड उपलब्ध झालाच नाही आणि त्यामुळे अक्षरक्ष कंटाळलेल्या रुग्णांना अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं. रुग्णसह संतप्त नातेवाईकही अलका चौकात बसून होते. मात्र रात्री उशिरा विश्रांतवाडीच्या रूग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर नातेवाईकांची समजूत काढून त्यांना तात्काळ महापालिकेच्या रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात आला होता. पण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button