breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून घेतलेल्या शपथविधीचे सत्यजीत तांबेनकडून कौतुक

नवी दिल्ली: राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतलेली आहे. या शपथविधी दरम्यान प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली आहे.

चतुर्वेदी यांनी मराठीतून घेतलेल्या शपथविधीचे उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कौतुक केले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन, आता तुम्ही खरे शिवसैनिक शोभता,” असे ट्विट उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button