breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात घेतली जाणार ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी; भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधील 6 स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची चाचणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली आहे.पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात या लसीचे उत्पादन झाले आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये सहा स्वयंसेवकांना आज या लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.

मंगळवारी या चाचणी प्रक्रियेचा भाग म्हणून तीन पुरुष आणि महिलांची तपासणी करण्यात आली. त्यांचा RT-PCR आणि अँटीबॉडी चाचणीचा रिपोर्ट क्लियर असेल तर त्यांना ऑक्सफर्डच्या लसीचा डोस देण्यात येणार आहे.

“सहा जणांवर आम्ही चाचणी करणार आहोत. त्यांची तपासणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यांची RT-PCR आणि अँटीबॉडी चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट अनुकूल आले तर लसीचा डोस दिला जाईल” असे भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय संचालक संजय लालवानी यांनी इंडियन एक्प्रेसला सांगितले.ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटयूटने ही लस बनवली आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ या ब्राण्डनेमखाली ही लस दिली जाणार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटयूटने ही लस बनवली आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ या ब्राण्डनेमखाली ही लस दिली जाणार आहे. ब्रिटीश-स्वीडीश औषध कंपनी अस्त्राझेनेकासोबत सिरमने देशात एक अब्ज लसीचे डोस बनवण्याचा करार करण्यात आला आहे. तीन ऑगस्ट रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सिरमला फेज २ आणि ३ ची मानवी चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.भारतात एकूण १७ वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेतर्फे चालवले जाणारे परेलमधील केईएम हॉस्पिटल आणि मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर हॉस्पिटलचा समावेश आहे.

भारतात एकूण १७ वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेतर्फे चालवले जाणारे परेलमधील केईएम हॉस्पिटल आणि मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर हॉस्पिटलचा समावेश आहे.

ऑक्सफर्डची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली आहे. ही लस टोचल्यानंतर धोकादायक करोना व्हायरपासून दुहेरी संरक्षण मिळू शकते असे संशोधनातून समोर आले आहे. ही लस म्हणजे करोना विरोधात महत्त्वाचा शोध असल्याचे संशोधक मानत आहेत.लसीचा डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज बरोबर किलर ‘टी-सेल्स’ची निर्मिती झाल्याचे दिसून आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button