breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

SSR Case | सुशांत प्रकरणी सीबीआय रियाला अटक करण्याची शक्यता

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला दररोज धक्कादायक वळणं मिळत आहेत. सीबीआय चौैकशीचा आज सहावा दिवस आहे. सीबीआयची टीम सलग सहा दिवस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुशांतची मैत्रीण आणि सीबीआयच्या रडारवर असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी रिया ही सीबीआयच्या ताब्यात असू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

रिया चक्रवर्तीला अटक करण्याएवढे पुरावे सीबीआयजवळ मिळाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून सीबीआय सुशांतच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. मात्र अद्याप रियाची चौकशी करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार रियाला सीबीआयकडून अटक होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ईडीकडून आज जया सहा यांची चौकशीसाठी समन्स पाठवण्यात येणार आहे. जया सहा श्रुती मोदीच्या टीममध्ये काम करत होती. जया सहा याचे नाव हे ड्रग्सच्या कथित व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आहेत. दरम्यान सुशांतच्या अकाऊंटमधून लाखो रुपये kwan टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले आहेत. तर या कंपनीच्या अकाऊंटमधून लाखो रुपये रिया आणि शौविकच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले गेलेत. जया सहा ही kwan टॅलेंट मॅनेजमेंटची व्यवस्थापकीय सल्लागार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button