breaking-newsपुणे

पुण्यात कोरोना टेस्टींग वाढवण्याची गरज – प्रकाश जावडेक

पुणे – देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीला मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, आता पुण्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे.याला आळा घालण्याकरता आता नागरिकांच्या कोरोना टेस्टिंग वाढण्याची गरज आहे अस मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आज (५ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी शहरासह जिल्हयातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय स्तरावरचा कोरोना स्थितीची सध्यस्थितीच सादरीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर सादर केले.

यावेळी प्रकाश जावडेकर यांनी अधिकारी यांना टेस्टिंग वाढविण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच जिथे गंभीर परिस्थिती आहे तिथे अधिक लक्ष देत त्यामागची कारणे शोधुन तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचनाही जावडेकरांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत .तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, आणि पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनीही शहरातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनीही कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागची कारणे जावडेकर यांना सांगितली.केंद्र सरकार नागरिकांना कोरोनापासुन दिलासा देण्याकरता डरो मत सावधानी करो असा नारा दिला होता. याबद्दल नागरिकांमध्ये प्रबोधन केले पाहिजे अशा सुचनाही केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button