breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

“नरेेंद्र मोदीजी अजून किती फेकणार, आता हद्द झाली राव”

मुंबई – बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी सध्या बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून ढाका येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मोदींच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. नरेंद्र मोदीजी अजून किती फेकणार, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

दरम्यान, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय 20-22 वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button