breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आचारसंहिता संपताच अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

  • आचारसंहिता कालावधीत वाढलेली बांधकामे पाडणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे, पत्राशेडचे प्रमाण वाढले आहे. त्या बांधकामावर महापालिकेच्या बांधकाम विभागाने धडक कारवाई सुरुवात केली आहे. त्यानूसार ताथवडे, काळेवाडी, पिंपळे गुरव परिसरात पत्राशेड, अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाने प्रभाग क्रमांक 25  मधील ताथवडे परिसरात बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने बांधकामावर कारवाई केली. त्यात 18 आरसीसी, 3 पत्राशेड, 2 वीट बांधकाम अशा एकूण 17205 चाैरस फुट बांधकामावर कारवाई केली.

तसेच आज (मंगळवार) पिंपळे गुरव, काळेवाडी परिसरात अनधिकृत बांधकामे व पत्राशेडवर कारवाई करण्यात येत आहे. काळेवाडीतील संत निरंकारी भवन रस्ता परिसरातील 10 बांधकामे पाडण्यात आली. तर पिंपळे गुरवमध्ये देखील डीपी रोडवरील पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. या कारवाई प्रसंगी कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक यांचे पथकाने केली. यावेळी पोलीस, जेसीबी, रुग्णवाहिका, मजूर व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात आचारसंहिता कालावधीत अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष होते. अनेक अधिकारी व कर्मचारी हे निवडणुक कामकाजात व्यस्त असल्याने नागरिक बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामे करतात. त्या बांधकामावर महापालिकेकडून कारवाई करुन पाडण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button