breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील सविता भाभीचं गूढ उलघडलं, अश्लील उद्योग मित्र मंडळाला नोटिस

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुण्यामध्ये गेल्या महिन्यात ”सविताभाभी तु इथच थांब” या नावाने शहरभर पोस्टर झळकले होते. त्यानंतर ही सविताभाभी नेमकी कोण आहे, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. या सविताभाभीचं गुढ अखेर उलघडलं असून ती एका नवीन चित्रपटाची जाहिरात होती, असी माहिती समोर आली आहे.

पुण्यात चक्क पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या ‘सविताभाभी’च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले होते. मात्र, ही ”अश्लील उद्योग मित्र मंडळ” या नव्या चित्रपटाची जाहिरात असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता धर्मकीर्ती सुमंत, अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांचा हा उपक्रम आहे. ही जाहिरात त्यांच्या आगामी सिनेमाची आहे.

हा प्रकार अश्लील उद्योग मित्र मंडळाचा प्रसिद्धी करण्याचा प्रकार होता. आता हा वाद थेट कोर्टात पोहोचला असून सविताभाभी या कॉमिक कॅरेक्टरवर निलेश गुप्ता यांनी दावा सांगत नोटीस धाडली आहे. अश्लील उद्योग मित्र मंडळ सिनेमाच्या निर्मात्यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. सविताभाभी हे पात्र कॉमिक कॉपीराईट असताना त्याबद्दल परवानगी न घेता त्याचा वापर केल्याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

या चित्रपटाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आवाज आहे. यामध्ये सई ताम्हणकर स्वत:ला सविता असल्याचं म्हणत आहे. गरजेपेक्षा जास्त माहिती आहे मात्र तुम्ही तिला कधीच पाहिलं नाही.. जिला कुणी कधीच पाहिलेलं नाही…असं सई म्हणाली आहे. यामध्ये एका तरुणाचाही आवाज आहे. 6 मार्च 2020 मध्ये या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च होणार आहे. अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button