breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

के. यान मशिन दुरूस्तीवर एक कोटींचा खर्च; आयुक्तांना फेरविचाराची सूचना

पिंपरी – महापालिकेच्या शाळेतील के. यान मशिन दुरूस्तीसाठी एक कोटीची निविदा काढली आहे. त्यावर आक्षेप घेऊन हे मशिन दुरूस्ती करण्यायोग्य असले तरी या मशिनच्या दुरूस्तीवर विनाकारण एक कोटी पाच लाखांचा खर्च केला जात आहे. या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा, अशी सूचना नगरसेविका आश्विनी चिंचवडे यांनी आयुक्तांना केली आहे.

 

यासंदर्भात आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शिक्षण विभागाने ९  वर्षापूर्वीचे के यान हे मशीन देखभाल करण्यासाठी २०१६ रोजी संबंधित एजन्सीला काम मिळाले होते. पुन्हा त्याच एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. मुळात ही निविदा प्रक्रियाच संशयास्पद वाटत आहे. २०१६ साली केलेल्या के यान देखभाल दुरुस्तीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत किती वाढ झाली? के यान वापराबाबतच्या दैनंदिन नोंदी ठेवण्यात आल्या होत्या का? के यान मध्ये नक्की कोणती दुरुस्ती केली? सर्व के यान मशीन दुरुस्त होऊन अभ्यासक्रम अपलोड झाला का? के यानचा वापर केलेल्या शिक्षकांची यादी, इयत्ता व शाळा यांच्या नोंदी ठेवल्या आहेत का? शिक्षण व संगणक तज्ञाकडून २०१६ मध्ये झालेल्या कामाची तपासणी व्हावी, अशी मागणी चिंचवड यांनी केली आहे.

 

२००९ मध्ये के यान ज्या संस्थेकडून घेण्यात आले. त्या संस्थेशी संपर्क साधून कोटेशन मागितले असता नवीन के यानची किंमत ९४ हजार ५०० रुपये आहे. त्यावर जुन्या मशिन देखभाल दुरुस्तीसाठी १ कोटी पाच लाखाचा खर्च केला जात आहे. या पैशाचा विनाकारण दुरूपयोग होत असल्याचे चिंचवडे यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा, अशीही सूचना आयुक्तांना करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button