breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील व्यापाऱ्याची हत्या, साताऱ्यात सापडला मृतदेह

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पुण्यातील प्रसिध्द व्यापार्‍याची 2 कोटीच्या खंडणीसाठी  गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. चंदन शेवानी (वय-४८,रा. बंडगार्डन) असे या हत्या झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सातारा जिल्ह्रयातील पाडेगाव ता. खंडाळा गावच्या कॅनॉलजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी यासंदर्भातील माहिती लोणंद पोलिसांना दिली. प्राथमिक तपासादरम्यान मृतदेह चंदन शेवानी यांचा असल्याची माहिती समोर आली.

डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहे. शनिवारी रात्रीपासून चंदन शेवानी यांचे कुटुंबिय त्यांच्याशी  संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबियांनी बंडगार्डन पोलिसांत चंदन शेवानी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button