breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी

बेसुमार पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने दणका दिला असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे पुण्यातील सिंहगड रस्ता, नवशा मारुती-चुनाभट्टीजवळील परिसर जलमय झाला आहे. जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याचे वृत्त असून यामुळे परिसरातील आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले आहे.

कालवा सल्लागार समिती, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बेसुमार पाणी वापरणाऱ्या महापालिकेला जलसंपदा विभागाने तिसऱ्यांदा दणका दिला आहे. पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा करणारे महापालिकेचे दोन पंप बुधवारी दुपारी तीन वाजता जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात आले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ- वॉटर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. तब्बल 2 तास हे पाणी वाहत होते. या बिघाडामुळे परिसरातील काही भागांमधील रस्त्यावर चार फूट पाणी साचले होते.

गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत होता. मात्र, त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button