breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राहुल आणि प्रियंका गांधींसह 35 खासदारही हाथरसला जाणार

नवी दिल्ली | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हे हाथरसकडे रवाना झाले आहेत. हे दोघेही पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. राहुल आणि प्रियांका गांधी दोन दिवसांपूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते.

परंतु दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील परी चौकात रोखून पुन्हा दिल्लीला पाठवले. तिथे राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की देखील झाली होती. यापार्श्वभूमीवर राहुल आणि प्रियांका गांधी हे हाथरसला जायला निघाले असून हाथरसकडे जाणाऱ्या रस्त्यावर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button