ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप आमदार सुरेश धसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल, औरंगाबाद खंडपीठाचा दणका

बीड | भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिलाय. आमदार धस यांच्यासह ३८ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात ३९५ कलम वाढवण्याच्या आदेशाने धसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आष्टी तालुक्यातील मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह ३८ जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आमदार सुरेश धस यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने आपल्या घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती. यावरून पोलिसांनी 143 , 147 , 148 , 149 , 427 , 336 आणि 379 ही कलमे लावली होती. मात्र त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमात वाढ करण्यात यावी. ही मागणी घेऊन औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली होती. त्यांनतर कलमात वाढ करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

माधुरी चौधरी यांच्या रिट याचिकेमुळे कलमात बदल होऊन दरोडा 395, बेकायदा घरात घुसने 448, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे 453, यासह शांतता भंग करणे आणि इतर 341, 504, 506 ही कलमे लावण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. यामुळे आता भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button