breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विभागात 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची, तर 8 हजार 305 क्विंटल भाजीपाल्याची आवक : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 305  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 3 हजार 955 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 13 हजार 868 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 5 मे 2020 रोजी  104.14 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.27 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

1 लाख 5 हजार 302 मजुरांना भोजन

 सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 158 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 251 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 477 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 33 हजार 502 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  5 हजार 302 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button