breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup 2023 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने

IND vs AFG : पहिल्या सामन्यात कठीण परिस्थितीतून लढत जिंकणारा भारतीय संघ बुधवारी विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करेल. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेण्याचे आव्हान भारतासमोर असेल, असे कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते. चेपॉकच्या धिम्या व फिरकीला अनुकूल अशा खेळपट्टीनंतर आता भारतीय संघ फिरोजशाह कोटलावर खेळणार आहे.

या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिका व श्रीलंका दरम्यान गेल्या आठवडय़ात झालेल्या सामन्यात ७०० हून अधिक धावा झाल्या होत्या. शुभमन गिल आजारी असल्याने हा सामना खेळणार नाही. त्यामुळे इशान किशनला पुन्हा एकदा रोहितसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल.

हेही वाचा – ‘राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून अटक करा’; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध किशन व श्रेयस अय्यर खराब फटका मारून बाद झाला होता. त्यामुळे भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात या दोन्ही फलंदाजांना ही चूक सुधारावी लागेल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button