breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Chess World Cup Final 2023 : बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आर. प्रज्ञानंदचा पराभव

Chess World Cup Final 2023 : बुद्धिबळ विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत भारताच्या आर प्रज्ञानंदला जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरीत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली पण टायब्रेकरमध्ये भारताच्या प्रज्ञानंदचा पराभव झाला.

पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने आपल्या खेळाची शैली बदलली आणि प्रज्ञानंदकडे उत्तर नव्हते आणि त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय

दरम्यान, तब्बल २१ वर्षांनी भारतीय खेळाडूला फिडे येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची संधी होती. पण प्रज्ञानानंदची झुंज अपयशी ठरली. यापूर्वी विश्वनाथन आनंदने २००२ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा प्रज्ञानानंदाचा जन्मही झाला नव्हता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button