breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे रेल्वे स्थानकात पोपट विक्री करणाऱ्यास पोलीस कोठडी

पुणे – बेकायदेशीर पोपट विक्री करणाऱ्या व्यक्‍तीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, त्याला न्यायालयाने 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चेतन मगन देसाई (32 , रा. कलवड वस्ती, लोहगाव रस्ता व लालचाळ गोखलेनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्‍ती पोपट विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंबईतील वन्यजीव अपराध नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला होता. संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्याजवळील पिशवीतील खोक्‍यात दोन पोपट आढळले. त्याच्याकडे पोपट खरेदी-विक्रीचा परवाना नव्हता. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार पोपट संरक्षीत जीव आहे. आरोपीने पोपट कसे पकडले, त्याचे आणखी साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button