breaking-newsपुणेमुंबई

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलवसुली आकडेवारीत गौडबंगाल

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रतिमहिना सरासरी ४३ लाख वाहने धावत असून, त्यात टोल न भरलेल्या वाहनांचाही समावेश असल्याची आकडेवारी पूर्वीच्या ठेकेदाराने दिली आहे.

नव्याने टोलवसुलीचा ठेका घेतलेल्या कंपनीने मात्र एका महिन्यात या रस्त्यावरून १६.९० लाख वाहने धावल्याचे आणि त्या सर्वाकडून टोलवसुली केल्याचे स्पष्ट केले आहे. दोनच महिन्यांच्या अंतराने जाहीर करण्यात आलेल्या या दोन्ही आकडय़ांमध्ये तिपटीचा फरक असला, तरी टोल वसुली तितकीच झाल्याचे दाखविल्याने आकडेवारीबाबत गौडबंगाल निर्माण झाले आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्याची मागणी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे करण्यात आली आहे.

द्रुतगती मार्गाच्या टोल वसुलीचा ठेका २००४ मध्ये १५ वर्षांसाठी देण्यात आला होता. या पहिल्या ठेकेदाराची मुदत ९ ऑगस्ट २०१९ रोजी संपली. त्यानंतर १० ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात नव्या ठेकेदाराकडे टोल वसुली देण्यात आली आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सप्टेंबर २०१५ पासून प्रत्येक टोल नाक्यांवरून जाणारी वाहने आणि जमा टोल याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार जुन्या ठेकेदाराने जाहीर केलेली माहिती आणि नव्या ठेकेदाराच्या माहितीमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button