breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी

एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छितात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली आहे. पण, त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केल्याचं पत्र १० मार्चला निघालं आहे. यावरून आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली.

जयंत पाटील म्हणाले की, विधानपरिषदेच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांचं नाव सुचवलं आहे. पण, १० मार्चला एक पत्र निघालं आहे. त्यात विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदी एकनाथ शिंदे यांची आणि अनिकेत तटकरे यांची प्रतोद म्हणून उपसभापतींनी नियुक्ती केली आहे.

ही चूक विधिमंडळाच्या वेबसाईटवर अजूनही आहे. मुख्यमंत्र्यांनी तर देशाचे पंतप्रधानच बदलले आहेत. देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू आहेत, असं जाहीर केलं आहे. त्यामुळे विधिमंडळाचं गटनेते पद धोक्यात आल्यासारखं दिसत आहे. नागालँडमध्ये मुख्यमंत्री रिओ हे सर्व पक्षांचा पाठिंबा घेत आहेत. ही नवीन पद्धत एकनाथ शिंदेंनी सुरू केली आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत, अशी मिश्कील टिप्पणी जयंत पाटलांनी केली.

जयंत पाटील यांनी दिलेली माहिती विधानपरिषदेच्या कामकाजाची दिसत आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजाबद्दल विधानसभेच्या सभागृहात चर्चा करता येणार नाही. पण, विधिमंडळाचा उल्लेख केला असल्याने याविषयी सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button