breaking-newsक्रिडा

दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनला विजेतेपद

पुणे – एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरी गटात जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-7(2), 7-6(5)असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या 32 वर्षीय केविन अँडरसन याने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर 39 वर्षीय क्रोएशियाच्या इवो कार्लोविचवर निर्विवाद वर्चस्व राखले. उत्कंठावर्धक 2 तास 44 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी वेगवान सर्व्हिसवर भर देताना एकूण 57 बिनतोड सर्व्हिसचा वर्षाव केला. त्यातील 21 बिनतोड सर्व्हिस करणाऱ्या केविन अँडरसनने अप्रतिम परतीचे फटके लगावताना हि लढत जिंकली.

एटीपी टूरच्या इतिहासातील सर्वाधिक उंच खेळाडू अंतिम फेरीत खेळण्याचा विक्रम यावेळी नोंदविला गेला. 6फूट 8 इंच उंचीच्या कार्लोविचने पहिल्या सेटमध्ये पहिल्या सर्व्हिसवर 90टक्के आणि दुसऱ्या सर्व्हिस 54 टक्के यश मिळवले. कार्लोविचने पहिल्या सेटमध्येच 11 बिनतोड सर्व्हिसचा मारा केला. परंतु परतीचे फटके तितकेसे परिणामकारक नसल्यामुळे त्याला अँडरसनची सर्व्हिस भेदता आली नाही.

कार्लोविचने दोन ब्रेक पॉईंट वाचवताना हा सेट टायब्रेकमध्ये नेला. पहिल्या सेटच्या टायब्रेकमध्ये कार्लोविचने एका बिनतोड सर्व्हिसच्या आधारे 2-1आघाडी घेतली होती. परंतु अँडरसनने सलग पाच गुण जिंकताना पुनरागमन केले आणि एका बिनतोड सर्व्हिससह हा सेट 7-6(4)असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये अँडरसन याने टायब्रेकमध्ये 4-1अशी आघाडी घेतली होती. परंतु, कार्लोविचने पुनरागमन केले आणि स्वतःची राखत हा सेट 7-6(2)असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्याने सेट टायब्रेकमध्ये गेला.

टायब्रेकमध्ये केविन अँडरसन 3-5असा पिछाडीवर असताना कार्लोविचने केलेल्या डबल फॉल्टमुळे त्याला कमबॅक करण्याची संधी मिळाली. अँडरसनने कार्लोविच सर्व्हिस ब्रेक करत पाठोपाठ स्वतः ची सर्व्हिस राखताना आघाडी घेतवर्चस्व कायम राखताना तिसरा सेट जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button