breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय राज्यात ‘रोल मॉडेल’ बनवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलीस कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच अन्‌ सायकल वाटप

पोलीस आयुक्तालयांतर्गत ग्राम सुरक्षा दलाचाही शुभारंभ

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय हे राज्यातील एक दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्मार्ट वॉच आणि सायकलचं वाटप करण्यात आलं तसंच ग्राम सुरक्षा दलाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. पवार बोलत होते.

यावेळी,मावळचे आमदार सुनिल शेळके, महापौर माई ढोरे,पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश व अन्य मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय हे राज्यातील एक दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. आवश्यक जागा,सोयीसुविधा,मनुष्यबळ,साधन सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. याबरोबरच पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस स्टेशनसाठी देखील आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल.

पोलिसांनी जागरुक राहून काम करावे…

पोलिसांनी देखील प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षिततेची भावना आणि पोलीस दलाबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम करावे. मुली, महिला, अन्य कोणताही नागरिक कुठल्याही भागात सुरक्षितपणे वावरू शकेल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी जागरूक राहून काम करावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button