breaking-newsक्रिडापुणे

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर घेतले गणपतीचे दर्शन

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी मंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. आफ्रिकेचा एनरिक नॉजे, जुबेर हमजा, डेन पीट आणि त्याची पत्नी, व्हर्नन फिलंडर आणि त्याची पत्नी यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातील दालनास भेट दिली. त्या दालनातील शस्त्रास्त्रे, अवजारे आणि फोटोंचे अवलोकन करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने केलेल्या नाबाद द्विशतकी (२५४) खेळीच्या बळावर भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा टप्पा ओलांडला. भारताने ६०१ धावांवर डाव घोषित केल्यावर दुसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३६ अशी झाली. एडन मार्क्रम, डीन एल्गर आणि टेंबा बावुमा या तिघांना दोन अंकी संख्याही गाठता आली नाही. उमेश यादवने २ तर मोहम्मह शमीने १ बळी टिपला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button